Ad will apear here
Next
हिमायतनगरमधील सरसम येथे रस्त्याचे उद्घाटन


हिमायतनगर : हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या स्थानिक निधीतून सरसम येथील इंदिरानगरमध्ये सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

एक मार्च २०१९ रोजी आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुकाप्रमुख राम ठाकरे यांनी भूषविले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गजानन चायल उपस्थिती होते. हिमायतनगर तालुक्यातील सरसम येथील इंदिरानगरच्या रहिवाशांनी मुख्य रस्त्यावर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची मागणी केली होती. रस्त्याची समस्या लक्षात घेऊन आमदार पाटील आष्टीकर यांनी इंदिरानगरअंतर्गत रस्ते नव्याने करण्याचा घेतला. त्या अनुषंगाने त्यांनी सरसम- इंदिरानगरसाठी चार लाखांचा निधी प्राप्त करून दिला.



आमदार आष्टीकर विधानसभा सभागृहातील कामकाजात व्यस्त असल्याने उद्घाटन कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष राठोड यांनी उपस्थिती लावली. या वेळी संतोष पुल्लेवार, साईनाथ धोबे, मारोती सूर्यवंशी, बालाजी मंडलवाड, अवधूत कदम, गजानन मिराशे, यदुराज मिराशे, प्रशांत मंडलवाड, सुभाष मिराशे, गुणाजी चव्हाण यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZYFBY
Similar Posts
हिमायतनगरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश हिमायतनगर : हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे आमदार नागेश पाटील-आष्टीकर आणि नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील अनेक तरुणांनी आणि काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा कार्यक्रम नगरपंचायतीच्या प्रांगणात आठ जुलै २०१९ रोजी झाला.
पर्जन्ययाग रुद्र स्वाहाकाराची सांगता मुसळधार पावसाने हिमायतनगर : पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले, तरीही हिमायतनगर तालुक्यात पाऊस झाला नसल्यामुळे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रेरणेतून हदगांव-हिमायतनगर मतदारसंघात पर्जन्ययाग रुद्र स्वाहाकार महायज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याची सांगता २७ जुलैला मुसळधार पावसाने झाली.
‘शिबदरा गावासाठी निधी कमी पडू देणार नाही’ हिमायतनगर : तालुक्यातील मौजे शिबदरा येथील मंदिर बांधकामासाठी व गावातील विविध विकास कामांसाठी १४ लाख ५० हजार रुपयांचा निधी हदगाव- हिमायतनगर तालुक्याचे आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी उपलब्ध करून दिला.
हिमायतनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेच्या धनादेशांचे वाटप हिमायतनगर : शहरातील नगरपंचायत कार्यालयातर्फे शहरातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा, तसेच अग्निशमन वाहनांचे व स्वछताविषयक साहित्याचे उद्घाटन हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आठ जुलै २०१९ रोजी झाला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language